नोकरी - घरगुती केअरगिव्हर (Home Based Caregiver)
एकूण मागणी - ३५००
ननोकरीचे ठिकाण - इस्रायल
लिंग - महिला (90%) / पुरुष (10%)
वयोमर्यादा - 25 ते 45 वर्षे
उंची / वजन - किमान 1.5 मीटर किंवा अधिक / किमान 45 किलो किंवा अधिक
किमान शैक्षणिक पात्रता - किमान 10 वी उत्तीर्ण
इंग्रजी भाषा - इंग्रजी ज्ञान आवश्यक (Intermediate / मध्यम स्तरावरील)
अनुभव, डिप्लोमा व प्रमाणपत्र -
- उमेदवाराने केअरगिव्हिंग सेवांमध्ये प्रशिक्षण घेतलेले असावे आणि किमान 990 तासांचा (OJT सहित) कोर्स पूर्ण केल्याचे भारतीय मान्यताप्राप्त प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र असावे.
किंवा
नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट किंवा मिडवायफरी यामधील भारतीय मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेकडून डिप्लोमा असावा.
- GDA / ANM / GNM / BSc Nursing / Post BSc Nursing
पासपोर्ट वैधता - किमान 3 वर्षे आवश्यक
एकूण वेतन - 6443.85 Israeli New Shekel (NIS) किंवा अंदाजे 2140.95 USD* किंवा अंदाजे ₹1,99,770 प्रति महिना
वैद्यकीय विमा - नियोक्त्याकडून**
कामाचे दिवस - आठवड्यात 6 दिवस
निवास - नियोक्त्याकडून***
अन्न - नियोक्त्याकडून****
कामाचे तास (Duty Hours) - केअरगिव्हरने नियोक्त्याची आठवडाभर राहून (live-in) काळजी घ्यावी. तथापि, विश्रांती, वैयक्तिक गरजा आणि झोप यासाठी योग्य ब्रेक दिले जातील.
रजा लाभ (Leave Benefits) -
- 9 दिवस धार्मिक/राष्ट्रीय सुट्ट्या (भारत किंवा इस्रायल)
- 16 दिवस वार्षिक सुट्टी
- इतर अटी SEC नुसार लागू
करार कालावधी - 2 वर्षे (नूतनीकरणीय)
PCC - आवश्यक (6 महिन्यांपेक्षा जास्त परदेश वास्तव्य असल्यास Overseas PCC आवश्यक
वैद्यकीय पात्रता - इस्रायल व्हिसा नियमानुसार
मुलाखत प्रकार - ऑनलाइन व व्हिडिओ रेकॉर्डेड
प्रवास तिकीट - उमेदवाराकडून
करार कालावधी - 2 वर्षे (नूतनीकरणीय)
इतर अटी -
- यापूर्वी इस्रायलमध्ये काम केलेले नसावे
- सद्यस्थितीत पती/पत्नी, पालक किंवा मुले इस्रायलमध्ये रहिवासी / कार्यरत नसावेत.
- शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे.
नोकरीचे सविस्तर वर्णन - अपंग व्यक्ती (PWDs), विशेषतः वृद्ध अपंग व्यक्तींची काळजी घेणे. दैनंदिन घरगुती कामे कामे: स्वच्छता, अंघोळ घालणे, कपडे घालणे इ., शौचालय सहाय्य / डायपर बदल, स्वयंपाक (अन्न तयार करणे), खाण्यास मदत, औषधे देणे, देखरेख करणे, उचलणे व हलविणे, घर स्वच्छ ठेवणे, खरेदी, धुलाई,दैनंदिन साहित्य खरेदी, घराबाहेर साथ देणे, इतर आवश्यक कामे इ.
निवड प्रक्रिया - निवड/नकाराचा अंतिम निर्णय इस्रायली नियोक्ता घेईल.
NSDC फक्त समन्वयक म्हणून कार्य करेल.
कृपया नोंद घ्या: -
- * वेतन: USD आणि NIS Exchange यांचा विनिमय दर सध्याच्या चलन दरानुसार निश्चित केला जाईल.
- ** वैद्यकीय विमा शुल्क:- (168.80 NIS) उमेदवाराच्या वेतनातून कपात करण्यात येईल.
- *** निवास भत्ता:- (कमाल 578.36 NIS पर्यंत) ठिकाणानुसार उमेदवारांच्या वेतनातून कपात करण्यात येईल.
- **** अन्न::-कामाच्या ठिकाणी केअरगिव्हरला अन्न पुरविण्यात आल्यास त्याचा बाजारभाव (सुमारे एकूण वेतनाच्या 10%) तसेच केअरगिव्हरला समजणाऱ्या भाषेत लिखित स्वरूपात करार झाल्यास नियोक्त्यास देय असलेली कोणतीही रक्कम, मात्र एकूण मासिक वेतनाच्या कमाल 25% पर्यंत.
- *****अतिरिक्त खर्च कपात: 94.34 NIS